‘रनपने पकडलेल्या गुरांचा लिलाव न करता ती गुरे विश्वहिन्दु परिषद संस्थेच्या ताब्यात द्यावी’

0

रत्नागिरी : ऱत्नागिरी नगरपरिषदेने पकडलेल्या गुरांचा लिलाव न करता ती गुरे विश्वहिन्दु परिषद संस्थेच्या ताब्यात द्यावी. त्या सर्व गुरांचे आम्ही गोशाळे मध्ये संगोपन करु त्यांचे पालन करु अशा स्वरूपाचे निवेदन रत्नागिरी नगरपरिषदेच्या उपमुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यावेळी आरोग्य विभागाचे श्री भोईर, श्री बारे व सभापती श्री विकास पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यावेळी श्री राजीव कीर, नगरसेविका सौ मानसीताई करमरकर, श्री वल्लभ केनवडेकर, ॲड श्री सचीन रेमाणे, श्री अनिकेत कोंडाजी, श्री सुशील कदम, श्री संग्राम आरेकर, गणेश गायकवाड, श्री विशाल पटेल, श्री चंद्रकांत राऊळ श्री आंब्रे आदी गोरक्षक उपस्थित होते. चर्चेमध्ये अनेक विषय पुढे आले. लिलाव हा भंगाराचा केला जाते. गोमाता ही आमची माता आहे. तिचे संगोपन करण्यास आम्ही तत्पर आहोत. कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमच्या मातेचा लिलाव करु देणार नाही. पकडलेल्या गुरांच्या तपासणीसाठी व उपाचारासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणुक व्हावी. पकडलेल्या गुरांना त्या ठिकाणी व्यवस्थित चारा पाणी मिळाले पाहिजे. यावर सभापती विकास पाटील यांनी तात्काळ दखल घेत गुरांच्या ठिकाणी पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था तपासली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:39 PM 05-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here