ऑक्टोबर अखेरपर्यंत दर्शनासाठी मंदिरं उघडणार ?

0

रत्नागिरी : मंदिरांवरील बंदी राज्य शासनाने उठवल्यानंतर मंदिरे खुली केली जावीत अशी मागणी भक्तगणांकडून होत आहे. त्यावर निर्णय झाला नसला तरीही ऑक्टोबर अखेरपर्यंत मंदिरे खुली केली जातील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र दर्शनासाठी मंदिर खुले केल्यास गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान राहणार आहे. त्यावर उपाययोजना म्हणून त्या ठिकाणांवरील कोरोनाची परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे लागणार आहेत. तसेच दररोज दर्शनासाठी ऑनलाईन नोंदणीचा पर्याय व्यवस्थापनांकडून सुचविला जात आहे. जिल्ह्यात गणपतीपुळे, पावस येथील स्वामी स्वरुपानंद समाधी, गणेशगुळे मंदिर, राजापूरमधील आडीवरेची महालक्ष्मी, सुर्यमंदिर, चिपळूणातील परशुराममंदिर, देवरुखमधील मार्लेश्‍वर यासारखी मोठमोठी प्रसिध्द देवस्थानं बंदच आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:39 PM 05-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here