दिलासादायक : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण घटले

0

रत्नागिरी : देशासह राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या कोरोनाचे संकट घोंगावत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वत्र खबरदारी राखली जात आहे. कोकणात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने गणेशोत्सव, शिमगासह सर्वच सण अत्यंत साधेपणानं साजरे केले गेले. पण, आता रत्नागिरी जिल्ह्यातून सर्वांना दिलासादायक अशी बातमी समोर येत आहे. कारण, सप्टेंबरच्या मध्यापर्यंत जिल्ह्यात रोज शंभर, दीडशे किंवा अगदी दोनशे रूग्ण देखील कोरोनाचे आढळून येत होते. आता मात्र हिच संख्या कमी होताना दिसून येत आहे. एकंदरीत आकडेवारी पाहिली असता 23 सप्टेंबर रोजी 71, 24 सप्टें. रोजी 51, 25 सप्टें. रोजी 116, 26 सप्टें. रोजी 44, 27 सप्टें. रोजी 68, 28 सप्टें. रोजी 85, 29 सप्टें. रोजी 64, 30 सप्टें. रोजी 77, 1 ऑक्टो. रोजी 91, 2 ऑक्टो. रोजी 67, 4 ऑक्टो. रोजी 38 रूग्ण आढळून आले. सध्याच्या घडीला जिल्ह्यात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या ही 86.06 टक्के इतकी झाली आहे. जिल्ह्यात 4 ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात एकूण 7669 कोरोना रूग्ण होते. पैकी 6600 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाचे रूग्ण आढळू लागल्याने त्याला रोखण्यासाठी गाव पातळीवर देखील काही निर्णय उत्फूर्तपणे घेतले जात आहेत. काही ठिकाणी बाजारपेठा बंद ठेवत काही काळ लॉकडाऊन केले जात आहे. केवळ कोरोनाला रोखणे हाच उद्देश असल्याचं मत यावेळी स्थानिक व्यक्त करतात. एकंदरीत सध्याची स्थिती पाहता कोरोना रूग्णांची संख्या कमी होत असली तरी नागरिक मात्र दिवसेंदिवस सतर्क होत असल्याचे दिसून येत आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:14 PM 05-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here