ना. उदय सामंत रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर

0

रत्नागिरी : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत मंगळवारी दि. ६ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम असा: मंगळवारी दि. ६ रोजी पुणे येथून मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण. सायंकाळी शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथे राखीव. बुधवार दि. ७ रोजी दुपारी ३.३० वाजता ‘माझे कुटुंब माझे जबाबदारी’ मोहीम व कोरोना आजार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आढावा बैठक. (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी). गुरुवारी दि. ८ रोजी सकाळी ११.३० वा. रत्नागिरी मतदारसंघातील जाखडी मंडळ कलाकारांसमवेतच्या कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : स्वयंवर मंगल कार्यालय, रत्नागिरी). दुपारी १ वाजता रत्नागिरी मतदारसंघातील भजन मंडळ कलाकारांसमवेतच्या कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : दैवज्ञ भवन रत्नागिरी). सायंकाळी ४.०० वाजत रत्नागिरी मतदारसंघातील नमन मंडळ कलाकारांसमवेतच्या कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : सिध्दगिरी मंगल कार्यालय, हातखंबा).

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
9:56 AM 06-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here