खाड्यांमधील गाळ काढण्यासाठी मत्स्य विभागाकडून प्रस्ताव

0

रत्नागिरी : वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिल्याने गाळात रुतलेल्या समुद्री खाड्या धोकादायक बनल्या आहेत. अनेक ठिकाणी मच्छीमारांना या खाड्यांच्या मुखातुनच किनार्‍यावर येण्याचा मार्ग आहे. मात्र खाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने नौका दुर्घटनाग्रस्त होत आहेत. या दुर्घटना टाळण्यासाठी सहायक मत्स्य संचालक विभागाने पुढाकार घेतला आहे. प्रधानमंत्री मत्स्य संवर्धन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 20 खाड्यामधील गाळ काढण्याचा प्रस्ताव मत्स्य आयुक्तांना सादर केला आहे. खाड्यांचा गाळ काढण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यास जिल्ह्यातील या खाड्या मोकळा श्‍वास सोडणार आहेत. एवढेच नव्हे, तर खाडीच्या मुखावर होणारे अपघात टळणार आहेत. मिर्‍या, भाट्ये, मालगुंड, खंडाळा, दाभोळ, हर्णै, नाटे आदी खाड्यांचा यामध्ये समावेश आहे. प्रधानमंत्री मत्स्य संवर्धन योजनेतुन या 20 खाड्यातील गाळ उपसला जावा, येत्या अधिवेशनामध्ये यावर निर्णय व्हावा, या साठी विस्तृत आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा तयार करण्यासाठी सहायक मत्स्य आयुक्त नागनाथ भादुले तसेच अधिकारी संतोष देसाई, परवाना अधिकारी रश्मी आंबुलकर, आदींनी महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आयुक्त अतुल पाटणे, प्रादेशिक उपायुक्त महेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा गाळ उपसण्याचा आराखडा तयार केला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:34 PM 06-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here