मैथिली गवाणकर खूनप्रकरणी संशयितास न्यायालयीन कोठडी

0

रत्नागिरी : खेडशी येथील मैथिली गवाणकर खून प्रकरणातील संशयिताला न्यायालयाने मंगळवारी न्यायालयीन कोठडी सुनावली. नीलेश उर्फ उक्कू प्रभाकर नागवेकर (३५, रा, भंडारवाडी खेडशी, रत्नागिरी) असे न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. ९ऑगस्ट २०१९ रोजी सायंकाळी ४ वा.सुमारास मैथिली प्रवीण गवाणकर (१६, रा.चिंचवाडी खेडशी, रत्नागिरी)ही बकऱ्या चरवण्यासाठी खेडशी गावातील मोडा जंगलात गेली होती.तेव्हा नीलेशने तिच्या डोक्यात जड वस्तू मारून तिचा खून केला होता. या संशयातून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने बुधवारी नीलेशला अटक केली होती. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी ६ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडीत करण्यात आली होती. मंगळवारी पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे नीलेशला पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:53 AM 07-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here