उद्यापासून ‘हे’ नऊ बदल होणार

0

नवी दिल्ली : देशामध्ये नव्याने आर्थिक नियमांमध्ये बदल होणार आहेत. हे बदल उद्या १ सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. तसेच काही नियमांमुळे फायदा होणार आहे, तर काही प्रमाणात तोटाही सहन करावा लागणार आहे. या नियमांचा सर्वसामान्य व्यक्तींच्या जीवनावर परिणाम होणार आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेतून पैसे काढणे, टीडीएस यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींवर नियम लागू होणार आहेत.  खालील बदल उद्यापासून लागू होतील : 1. भारतीय रेल्वेच्या IRCTC या वेबसाईटवरून तिकिट बुकिंग केल्यास आपल्याला अतिरिक्त सेवा शुल्क भरावा लागणार आहे.  2. मोटार वाहन कायद्यातही मोठा बदल करण्यात आले आहेत. वाहतुकीच्या नियम पूर्वीपेक्षा कडक करण्यात आले आहेत. तुमच्याकडे वाहतूक परवाना (लायसन्स) नसल्यास किंवा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास आता दहापट दंड मोजावा लागणार आहे.   3. वर्षाला बँक खात्यातून एक कोटींहून अधिक रक्कम काढत असाल, तर तुम्हाला 2 टक्के जास्त TDS (Tax Deducted at Source) १ सप्टेंबरपासून मोजावा लागणार आहे. 4. कर दात्यांच्या बँकेतील प्रत्येक छोट्यामोठ्या व्यवहारावर नजर ठेवली जाणार आहे. तसेच कर भरणाऱ्यांच्या बँकेतील सर्व व्यवहारांची माहितीही तपासली जाणार आहे. याआधी बँकेतून 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढली तर त्याची माहिती आयकर विभागाला (Income Tax) द्यावी लागायची. आता या नियमात बदल करण्यात आला आहे.   5. जर तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक केले नसेल, तर आयकर विभागातून नवीन पॅन कार्ड देण्यात येणार आहे.  6. कार पार्किंग, क्लब मेंबरशिप यासारख्या अन्य सुविधांमुळे नवे घर खरेदी करताना जादा TDS भरावा लागणार आहे. हा खर्चही TDS मध्ये मोजला जाणार आहे. 7. तसेच घराची डागडूजी करायची असल्यास आणि तुमचे वार्षिक उत्पन्न 50 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 5 टक्के TDS भरावा मोजावा लागणार. 8. पेटीएम, फोन पे तसेच गुगल पे यासारख्या मोबाईल ई- वॉलेटचा वापर करणाऱ्यांना 31 ऑगस्टपर्यंत KYC पूर्ण करावी लागणार आहे. अन्यथा 1 सप्टेंबरपासून तुम्हाला मोबाईल वॉलेटचा वापर करता येणार नाही. नुकतेच याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने विविध मोबाईल वॉलेट कंपन्यांना नोटीसा पाठवल्या आहेत. 9. 1 सप्टेंबरपासून बँकांच्या कामकाजाची वेळ ही 10 ते 5 होती. आता सकाळी 10 ऐवजी 9 वाजता बँका उघडणार आहेत. त्यामुळे ऑफिसला जाण्यापूर्वी बँकांशी संबधित कामे पूर्ण करुन जाऊ शकता येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here