‘MPSC’चा मोठा निर्णय; उत्तरपत्रिकांच्या स्कॅन इमेजेस उमेदवारांच्या प्रोफाईलवर प्रसिद्ध करणार

0

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) आयोजित केल्या जाणाऱ्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या सर्व परीक्षांबाबत महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. आता पेपर तपासणीनंतर मिळालेल्या गुणांसह मूळ उत्तरपत्रिकांच्या स्कॅन इमेजेस उमेदवारांना त्यांच्या प्रोफाइलवर उपलब्ध करून देणार असल्याचे प्रसिध्द पत्रकातून जाहीर केले आहे. उमेदवाराला मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज, निकालाकरीता गृहित धरलेले एकूण गुण, उमेदवार पात्र असलेल्या प्रवर्गाकरीताच्या गुणांची किमान सीमांकन रेषा अशी एकूण माहिती दिली जाणार आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

उमेदवारांना दोन भागांची उत्तरपत्रिका उपलब्ध करुन देण्यात येते. त्यापैकी भाग -१ ( मूळ प्रत ) हा परीक्षेनंतर आयोगाच्या कार्यालयाकडे जमा करण्यात येतो. तर भाग -२ (कार्बन प्रत ) परीक्षेनंतर सोबत घेऊन जाण्याची मुभा उमेदवारास देण्यात आली आहे. एमपीएससीकडुन परीक्षा होताच काही दिवसांनंतर उत्तर पत्रिका जाहीर केली जाते. त्यावरून उमेदवार त्यांच्या जवळ उपलब्ध असलेल्या कार्बन प्रतीवर गुणांचा अंदाज बांधता येत होता. निकालानंतर मूळ प्रत पाहता येत नव्हती. आता मात्र ती पाहता येणार असून पारदर्शकता अधिक वाढणार आहे. एमपीएससीच्या नियमानुसार, उमेदवाराने परीक्षेच्या वेळी त्यांची उत्तरे उत्तरपत्रिकेवर आयोगाच्या सूचनांनुसार व उत्तरपत्रिकेच्या मलपृष्ठावर सविस्तरपणे दिलेल्या सूचनांनुसार नोंदविणे ( वर्तुळ छायांकित करणे ) गरजेचे आहे . उत्तरपत्रिकेच्या भाग -२ ( कार्बन प्रत ) वरुन उमेदवारास त्याने संबंधित परीक्षेमध्ये छायांकित केलेली उत्तरे आयोगाकडून प्रसिध्द करण्यात आलेल्या उत्तरतालिकेवरुन पडताळून पाहता येतात . त्यामुळे उमेदवारास प्राप्त होऊ शकणाऱ्या गुणांचा अंदाज बांधता येतो . उमेदवारांना त्यांनी संबंधित परीक्षेमध्ये प्रत्यक्ष प्राप्त केलेले अचूक गुण ज्ञात व्हावेत व उमेदवारास परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या गुणांच्या संदर्भात कोणतीही शंका राहू नये. याकरीता एमपीएससीने संबंधित परीक्षेच्या निकालानंतर त्यांच्या वैयक्तिक प्रोफाईलद्वारे उपलब्ध करुन देण्याचा आयोगाकडून निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय दि. १ ऑक्टोबर नंतर आयोजित होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा , मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा तसेच चाळणी परीक्षांकरीता लागू राहणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:55 PM 07-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here