आयुर्वेद संशोधन मंजूर केंद्र प्रकल्पासाठी आडाळी, (दोडामार्ग) मध्ये जागा केव्हा मिळणार ?

0

✍️ अँड विलास पाटणे

➡ दोडामार्गमध्ये –आडाळीत केंद्राच्या आयुष मंत्रालयातर्फे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसीनल प्लॅन्ट या महत्वाकांक्षी प्रकल्प उभारणीसाठी हिरवा कंदील दाखवला गेला होता, त्यासाठी आयुष मंत्रालयाने मंजुरी दिल्याप्रमाणे प्रकल्पाला तातडीने जामिन उपलब्ध करून देणे आवश्यक होते . .प्रकल्पामुळे कोकणातील औषधी वनस्पतीवर संशोधन होऊन त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ व रोजगार उपलब्ध होऊ शकतो . कोकणचा हा महत्वाचा प्रकल्प राज्यात इतरत्र हलवण्याची पद्धतशीर योजना आखली गेल्याचे समजते

केंद्राच्या या पर्यावरण पुरक आयुर्वेदीक वनस्पतीवर संशोधन करणाऱ्या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकार सिंधुदुर्गात आडाळीत जागा कधी देणार ? केंद्रीय मंत्री मा.श्रीपादजी नाईक सिंघुदुर्गात प्रकल्प व्हावा म्हणुन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दि 5 आक्टो 2020 रोजी स्मरण पत्र लिहून विनंती केली आहे .गेले वर्षभर प्रकल्प जमिनीमुळे का लटकला आहे , हे न समजण्यासारखे आहे .

आडाळी (सिँधुदुर्ग ) एमआयडीसी येथे शंभर एकर जागेमध्ये केंद्रीय आयुर्वेद वनस्पती संशोधन केंद्र (NIMP) करण्याबाबत आयुष मंत्री मा .श्रीपादभाऊ नाईक यांनी मंजुरी दिलेली आहे. मात्र राज्य सरकार कडून ही जागा तातडीने हस्तांतरण होण्याची गरज होती .अस असताना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी मंजुरी द्यायचे सोडुन सदर केंद्र लातुरला करा अशी उफराटी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. ” श्रीपाद नाईक यांच्याशी हे आयुर्वेद संशोधन केंद्र मंजुरीसाठी माजी आम .प्रमोद जठार पाठपुरावा करीत आहेत . मी स्वतः श्रीपादभाऊंशी असाच प्रकल्प रत्नागिरीत करावा असा आग्रह धरला होता . सिंधुदुर्ग जिल्ह्यात असणाऱ्या साडेतीनशेहून अधिक दुर्मिळ औषधी वनस्पतींच्या पार्श्वभूमीवर हे आयुर्वेद संशोधन केंद्र सिंधुदुर्ग दोडामार्ग येथील आडाळी एमआयडीसीच्या जागेत करणे उचित आहे. .जागा दिल्यावर ताबडतोब आयुर्वेद संशोधन केंद्र सुरू करण्यात येईल असे सकारात्मक पत्र दिले असताना याबाबत राज्य सरकार केवळ जमीन हस्तांतरण प्रक्रिया करणे बाकी असतानाही याकडे दुर्लक्ष करते आहे ,हे अक्षम्य आहे .हे आयुर्वेद संशोधन केंद्र लातूर येथे नेण्यासाठी अमित देशमुख हे प्रयत्नशिल आहेत . मुळात लातूरमध्ये पाणीपुरवठा मिरजेहून ट्रेनने करावा लागतो, सह्याद्रीमधील समृद्ध पर्यावरणाची औषधी वनस्पनीची वानवा आहे अशा ठिकाणी हे संशोधन केंद्र नेण्यामध्ये राज्य सरकारचा हेतू अनाकलनीय आहे .
मुलतः आर्युवेद आणि औषधी वनस्पती याची कोकणला मोठी परंपरा आहे .यास्तव आडाळीचे आर्युवेद मंजुर संशोधन केंद्र तातडीने करावे . त्यानंतर रत्नागिरीचा प्राधान्याने विचार झाला पाहीजे . लातूरला प्यायला पाणी नाही ,एक झाड नाही . वनस्पतीच नाही तर औषधी वनस्पती कोठून येणार ? मासे कोकणात मत्स्यविद्यापिठ नागपुरला त्याच दिशेने विकास चालू आहे .

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:55 PM 07-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here