‘नमो’ युगास 19 वर्षे पूर्ण

0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. नरेंद्र मोदी यांनी आज राज्य आणि त्यानंतर केंद्र सरकारच्या प्रमुखपदी राहून 19 वर्षे पूर्ण केली आहेत. नरेंद्र मोदी जवळपास 14 वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि आता 6 वर्षे देशाचे पंतप्रधान या पदावर आहेत. यानिमित्ताने भारतीय जनता पक्ष उत्सव साजरा करत असून, सर्वच स्तरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. नरेंद्र मोदी यांनी 7 ऑक्टोबर 2001ला गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला आणि 22 मे 2014पर्यंत हे मुख्यमंत्रिपदी होते. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014ला पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि तेव्हापासून आजतागायत ते पंतप्रधानपदावर कायम आहेत 7 ऑक्टोबर 2001 साली नरेंद मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. कोणतेही शासकीय पद किंवा प्रशासनिक जबाबदारीचा अनुभव नसताना तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांच्या निर्देशाद्वारे संघ प्रचारक- गुजरात भाजप संघटन मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय संघटन मंत्री असा विविध जबाबदा-या संभाळणा-या नरेंद मोदींवर गुजरातची जबाबदारी देण्यात आली. भूजचा भयावह भूकंप, गोध्रामध्ये झालेली घटना, गुजरात दंगल यातून मार्ग काढीत गुजरात राज्याला समाज-जीवनाच्या सर्व क्षेत्रात अग्रसर ठेवत मोदींनी स्वतःचे वेगळे विश्व निर्माण केले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

2001, 2002, 2007, 2012 साली चारवेळा मुख्यमंत्री म्हणून कार्य केल्यांनतर 2013 साली नरेंद मोदींनी पुन्हा एकदा सक्रीय राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला आणि भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून अमित शहांना सोबत घेत 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व, विलक्षण आणि न भुतोन भविष्यती असा विजय भाजपला मिळवून देत पंतप्रधान पदाची दोनदा शपथ घेतली आणि अखिल भारतात भाजपचे राजकीय सबलीकरण केले.

नरेंद्र मोदीं गुजरातमध्ये सातत्याने विजय संपादित करत भाजपा किल्ला मजबूत केला. मुख्यमंत्री असताना तीन वेळा मोदी अहमदाबादच्या मणिनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार होते. 7 ऑक्टोबर 2001 साली नरेंद मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी राजकोट ग्रामीणमधून निवडणूक लढविली. राजकीय-सामाजिक आणि वैयक्तिक टीका-निंदा सहन करत विरोधीपक्ष आणि पक्षांतर्गत हेवेदाव्यांवर विजय मिळवत नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय राजकारणात पदार्पण केले. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्त्वात भाजपला 26 पैकी 26 जागा प्राप्त झाल्या. 2014 साली मोदींनी वाराणसी आणि वडोदरा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली. ते सध्या वाराणसीचे खासदार आहेत.

मोदींना पंतप्रधान पदाचा कार्यभार सांभाळून एकूण सहा वर्ष पूर्ण झाले आहे. 2014 साली लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर 26 मे 2014 साली मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. 30 मे 2019 रोजी नरेंद्र मोदींनी दुस-यांदा राष्ट्रपती भवन परिसरात झालेल्या भव्य कार्यक्रमात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. देशांतर्गत राजकारणासह अगदी तोड्याचा काळात वैश्विक पटलावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घवघवीत यश संपादित केले आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. विज्ञान-तंत्रज्ञान आणि आधुनिक संवादाच्या विविध माध्यमाद्वारे मोदींनी युवकांमध्ये वेगळी पकड आणि आकर्षण निर्माण केले. अनेक सामाजिक माध्यमांवर सक्रीय असलेले मोदी नागरिकांशी विविध प्रकारे संवाद साधत असतात. ‘नमो’ या टोपणनावाने प्रसिद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधक आणि समर्थकांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वात 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपाला विक्रमी 303 जागा प्राप्त झाल्या होत्या. 2014 साली नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह यांच्या जोडीने 282 जागांसह भाजपाने प्रचंड विजय मिळवला होता. दोन्ही लोकसभा निवडणुकीत भाजपाला लाभलेल्या उत्स्फूर्त प्रतिसाद आणि ज्वलंत विजयात नरेंद्र मोदी आणे अमित शहा यांचा मोठा वाटा आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अमित शाह यांच्या नेतृत्वात भाजपाला विक्रमी 303 जागा प्राप्त झाल्या. त्यानंतर अमित शहा यांना केंद्रीय गृहमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. आपल्या कार्यकाळात अमित शहा यांनी पक्षाचा संपूर्ण देशात विस्तार केला आणि जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला समोर आणले.

लोकप्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री ते पंतप्रधान असा कर्तृत्ववान प्रवास पूर्ण केल्याबद्दल केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, भाजपचे सर्व स्तरातील नेते, सामान्य नागरिक, चाहते आणि प्रशंसक मोदींचे विविध समाजिक माध्यमाद्वारे अभिनंदन करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:12 PM 07-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here