मास्कच्या किमतींवर नियंत्रण, अवघ्या 3 ते 4 रुपयात मिळणार मास्क; राज्य सरकारचे मोठे पाऊल

0

मुंबई : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सॅनिटायझर दुप्पट-तिप्पट भावाने विकल्या जात असल्याचं अनेकदा समोर आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतीवर नियंत्रण आणण्यासाठी समिती नेमली होती. या समितीने नुकतंच राज्य सरकारला याबाबतचा अहवाल सादर केला. त्यानुसार एन-95 मास्क त्याच्या प्रकारानुसार साधारण 19 ते 50 रुपयांपर्यंत उपलब्ध होईल. तर दुहेरी आणि तिहेरी पदरांचे मास्क अवघ्या तीन ते चार रुपयांना मिळतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. या समितीने निर्धारित केलेल्या किंमतीवर निर्णय घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या किंमतींना शासन मान्यता मिळाल्यानंतर सुधारीत दरानुसार मास्क विक्री करणे बंधनकारक असणार आहे. तसेच सर्वसामान्यांना परवडणाऱ्या अशा किफायतशीर किमतीत मास्क उपलब्ध होणार असल्यानं असा निर्णय घेणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे, असेही राजेश टोपे म्हणाले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:10 AM 08-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here