रत्नागिरीत स्वॅब घेण्याच्या बहाण्याने फसवणूक करणारा तोतया ताब्यात

0

रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयातून कोरोना चाचणीसाठी लॅब कर्मचारी आलोय असे सांगून आर्थिक फसवणूक करणाऱ्या तोतयाच्या शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास शांतीनगर परिसरात घडली. अल्तमश मुनाफ पेटकर (रा. एकता मार्ग उद्यमनगर,रत्नागिरी) असे अटक करुन गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तोतयाचे नाव आहे. त्याच्याकडून ८०० रूपये हस्तगत करण्यात आले. शांतीनगर परिसरातील मंगलमूर्ती अपार्टमेंटमध्ये अल्तमश पेटकर हा पीपीई किट घालून गेला होता. त्या भागातील झरना मेहता यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:44 AM 08-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here