एसटी स्थानकांवरील उद्योगांना परवानगी द्यावी : डॉ. विनय नातू

0

रत्नागिरी : एसटी बसस्थानकांवरील स्टॉल आणि इतर उद्योग सुरू करायला परवानगी द्यावी, अशी मागणी भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी केली आहे. एसटीच्या विविध स्थानकांवरील उपाहारगृहे, पुस्तके-वर्तमानपत्र विक्रेते, फळ विक्रेते, रसवंतीगृहे, पान टपरी, जनरल स्टोअर्स अशा विविध परवानाधारकांचे लॉकडाउनच्या काळात मोठे नुकसान झाले आहे. गेल्या २० ऑगस्टपासून आंतरराज्य वाहतुकीस परवानगी मिळाल्याने राज्य परिवहन वाहतूक बऱ्याच अंशी सुरू झाली आहे. त्यामुळे राज्य शासनाने नियम व अटीद्वारे आगारातील वाणिज्य आस्थापना सुरू करण्याबाबत परवानगी द्यावी, अशी मागणी श्री. नातू यांनी मुख्यमंत्र्यांकडे कली आहे. अनेक महिने एसटी बंद असल्याने हे व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे वाणिज्य आस्थापनांच्या परवाना शुल्कमध्ये सवलत द्यावी, अशीही मागणीही डॉ. नातू यांनी केली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:09 AM 08-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here