कर्जाच्या बहाण्याने फसवणूक केल्याप्रकरणी ‘त्या’ संशयितास ९ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी

0

रत्नागिरी : कर्ज देण्याच्या बहाण्याने ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणातील संशयित अमोल मुरकर (रा. भाट्ये, रत्नागिरी) शहर पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला ९ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्याच्याविरोधात प्रणव नंदकुमार देसाई (३५, रा. मातृपितृ छाया एस. व्ही. रोड, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली होती. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:48 AM 08-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here