मॅग्मो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीच ‘पितळ’ उघडे पाडले

0

रत्नागिरी : डॉ. बोल्डे यांच्याकडे पदभार न दिल्यास राजीनामा सत्र सुरु करू असा इशारा देणारे मॅग्मो संघटनेचे अध्यक्ष डॉ. भगवान पितळे यांचे ‘पितळ’ त्यांच्याच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीच उघडे पाडले आहे. डॉ. भगवान पितळे यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी मॅग्मोच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला विश्वासात न घेता हे वक्तव्य केल्याचा खुलासा मॅग्मोच्या लेटरहेड वरून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात केला आहे. जिल्हाधिकारी यांना मॅग्मो संघटनेकडून देण्यात आलेल्या पत्रात असे म्हटले आहे कि डॉ. बोल्डे यांच्या कालावधीत जिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचारी मानसिक तणावाखाली काम करत होते. बोल्डे यांच्या सरंजामशाहीला कंटाळून पाच ते सहा वैद्यकीय अधिकारी यांनी राजीनामा दिला आहे. तसेच अन्य कर्मचारी राजीनामा देण्याच्या तयारीत होते. या सर्वांना नाविन प्रभारी डॉ. फुले यांच्यामुळे दिलासा मिळाला आहे. जिल्हा प्रशासनाने डॉ. बोल्डे यांचा पदभार काढून घेतलेला निर्णय योग्य असून याबाबत मॅग्मो संघटनेचा कोणताही आक्षेप नाही. डॉ. पितळे यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी तसेच काही जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची मर्जी राखण्यासाठी असे वक्तव्य केले असून त्याबाबत मॅग्मो संघटनेचा कोणताही सबंध नाही असा खुलासा मॅग्मो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना लिहिलेल्या पत्रातून करण्यात आला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
11:49 AM 08/Oct/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here