कोरोनाविरोधात पंतप्रधान छेडणार जनआंदोलन, देशाला देणार शपथ

0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना विरोधात जनआंदोलन छेडणार आहेत. कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी स्वत:ला आणि कुटुंबाला वाचवण्यासाठी पंतप्रधानांकडून शपथ दिली जाणार आहे. देशात ६८ लाखाहून अधिक जण कोरोना वायरसच्या संपर्कात आलेयत. पण यातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे.हिवाळा आणि त्यात आलेल्या सणांमध्ये कोरोना वेग वाढू नये यासाठी पंतप्रधान जनतेला आवाहन करणार आहे. मास्क वापरणे, दोन फुटांचे अंतर आणि सतत हात धुवण्याचा संदेश पंतप्रधान देणार आहेत. कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या ८५.०२ टक्क्यांवर पोहोचलीय. पंतप्रधानांच्या नव्या मोहिमेतून १३५ कोटी भारतीयांना कोरोना विरोधात लढण्याची शपथ दिली जाईल. देशवासिय कोरोनापासून स्वत: आणि कुटुंबाचा बचाव करण्याची शपथ घेतील.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:20 PM 08-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here