केवळ ‘या’ गोष्टींमुळे झाला चेन्नईचा पराभव : एमएस धोनी

0

आयपीएलमध्ये बुधवारी (7 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्सला 10 धावांनी पराभूत केले. कोलकाताने दिलेल्या 168 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात चांगली झाली. 12 षटकांनंतर चेन्नईची धावसंख्या 1 बाद 99 अशी होती. मात्र त्यानंतर चेन्नईची मधली फळी गडगडली आणि संघाला 20 षटकांत केवळ 157 धावाच करता आल्या. फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे चेन्नईचा पराभव झाला असे या सामन्यानंतर चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने सांगितले.

सामन्यात एकेवेळी मजबूत स्थितीत असलेला चेन्नई संघ सलामीवीर शेन वॉटसन बाद झाल्यानंतर पिछाडीवर गेला. मोठे फटके खेळण्याची गरज असतानाही कर्णधार एमएस धोनीने 90 च्या स्ट्राईक रेटने आणि केदार जाधवने 58 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. सामन्यानंतर बोलताना धोनी म्हणाला, “मधल्या षटकांत केकेआरच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. आम्ही या षटकांत महत्वाचे गडी गमावले. या षटकांत आमची फलंदाजी अधिक चांगली झाली असती तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. सुरुवातीला आम्ही नवीन चेंडूने चांगला खेळ केला. फिरकीपटू कर्ण शर्माने चांगली गोलंदाजी केली. आमच्या गोलंदाजांनी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळेच आम्ही केकेआरला 167 धावांवर रोखू शकलो.” पुढे बोलताना धोनी म्हणाला, “शेवटच्या काही षटकांत मोठे फटके खेळणे गरजेचे होते, त्यामध्ये आम्ही अपयशी ठरलो. तुम्हाला खराब चेंडूची वाट पाहावी लागते आणि त्यावर मोठे फटके खेळावे लागते.” चेन्नईकडून कर्णधार एमएस धोनीने 12 चेंडूंत 11 धावा केल्या आणि केदार जाधव 12 चेंडूत सात धावा करून नाबाद राहिला. या दोन्ही अनुभवी फलंदाजांचा स्ट्राईक रेट सर्वात कमी होता. शेन वॉटसनने सलग दुसरे अर्धशतक झळकावले तर रविंद्र जडेजाने अखेरच्या काही षटकांत आठ चेंडूंत 21 धावा ठोकल्या.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:12 PM 08-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here