”आत्मनिर्भर भारतातून मोदी सरकारला नक्की काय म्हणायचं तेच स्पष्ट नाही”

0

नवी दिल्ली : काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘आत्मनिर्भर भारत’ची घोषणा केली होती. यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी या अभियानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. राजन म्हणाले, सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाचा परिणाम संरक्षणवादावर होऊ नये. यापूर्वीही अशा प्रकारची धोरणं अवलंबली गेली होती, मात्र त्याचा काही फायदा झालेला नाही. आत्मनिर्भर भारतातून सरकारला नक्की काय म्हणायचं आहे हेदेखील अजून स्पष्ट झालं नाहीये. जर हे उत्पादनासाठी वातावरण तयार करण्याविषयी असेल तर ते ‘मेक इन इंडिया’ हा उपक्रम सादर करण्यासारखंच आहे, असंही राजन यांनी सांगितलंय.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:34 PM 08-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here