10 ऑक्टोबरचा ‘महाराष्ट्र बंद’ स्थगित

0

◼️ मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर मराठा नेत्यांंची घोषणा

मुंबई : राज्यातील वातावरण मराठा आरक्षणावरुन चांगलेच तापले असून मराठा आरक्षणासह उद्या, शनिवारी मराठा आरक्षण समितीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. पण अनेक मागण्या सरकारने मान्य केल्यामुळे उद्याचा बंद मागे घेत असल्याची माहिती मराठा सकल महासंघाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली आहे. बंद मागे घेण्याबाबतची घोषणा सुरेश पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर केली आहे. काल रात्री उशीरा सह्याद्री अतिथीगृहावर या संदर्भात बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, अनिल परब, विजय वडेट्टीवार उपस्थित होते. सुरेश पाटील यांनी सांगितले की, रात्री उशीरा बैठक झाली. सरकारने अनेक मागण्या मान्य केल्याने उद्याचा बंद मागे घेत आहोत.


काय काय मागण्या मान्य झाल्या

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ विकास महामंडाळासाठी 400 कोटी

सारथी साठी 130 कोटी

शैक्षणिक शुल्क फी साठी 600 कोटी

मराठा महासंघाच्या मोर्चातील दाखल केलेले गुन्हे मागे घेणार

मराठा क्रांती मोर्चात बलिदान दिलेल्या मुलांच्या कुटुंबातील एकाला नोकरी

मराठा आरक्षणाच्या बाबत वकील लावून आम्ही आरक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न करणार, स्टे उठवून देणार

इडब्लूएस आरक्षण आणि नोकरभरतीसाठी एक महिन्याची मागणी मान्य

एमपीएससीच्या विद्यार्थांच्या परीक्षेबाबत – जोपर्यंत स्टे आहे, तोपर्यंत केंद्रातले दहा टक्के लागू करण्याची मागणी मान्य करण्यासाठी एक बॉडी तयार करुन निर्णय घेतला जाणार, त्यासाठी एक महिन्याची मुदत मागून घेतली

आजपासून ठोक मोर्चाला सुरुवात
मराठा आरक्षण स्थगितीविरोधात आजपासून ठोक मोर्चाला सुरुवात झाली आहे. तुळजापुरात महिला मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चाला खासदार संभाजीराजे छत्रपतींसह राज्यभरातील समन्वय उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तर एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यास सरकार अनुकूल असल्याचा दावा शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंनी केला आहे. तर दुसरीकडे वेळेवर परीक्षा घेण्याची मागणी प्रकाश आंबेडकर आणि दलित महासंघाकडून करण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:07 AM 09-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here