सायली साने चे अमेरिकेत आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेमध्ये स्पृहणीय यश

0

रत्नागिरी : रत्नागिरीच्या सायली साने ने आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळवले आहे. सहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे आंतरराष्ट्रीय “माय लाईफ माय योगा” ही स्पर्धा आयोजित केली होती. तिचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये सायली सानेने अमेरिकेमध्ये, 18 वर्षांवरील महिलांच्या/मुलींच्या गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवला. स्पर्धेमध्ये मी योग कसा करते याचे प्रात्यक्षिक आणि त्यापासून झालेले फायदे याचे वर्णन करणारा तीन मिनिटांचा व्हीडिओ पाठवावयाचा होता. सायली रत्नागिरीची रहिवासी असून जीजीपीएस, अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय आणि फिनोलेक्स अकॅडमी यांची माजी विद्यार्थिनी आहे. अमेरिकेमध्ये कम्प्युटर सायन्स मध्ये मध्ये एमएस केल्यावर (पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर) ती आता तिथेच नोकरी करत आहे. रत्नागिरी येथील पतंजलिचे योगशिक्षक श्री विनय साने व सौ नीता साने यांची मुलगी आहे. या यशाबद्दल सर्वांनी तिचे कौतुक केले आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:07 PM 09-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here