दापोलीत बेकायदा जुगार साहित्य बागळल्याप्रकरणी गुन्हा दाखल

0

दापोली : तालुक्यातील कामगार गल्ली येथे बेकायदा जुगार खेळ चालवण्यासाठीचे साहित्य बागळल्याप्रकरणी एकाविरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.२५ वा.सुमारास करण्यात आली. संतोष पायधुळ हळदणकर (४०,रा. तिवरेवाडी, दापोली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी तो बेकायदा जुगार चालवण्यासाठी १ हजार ३०२ रुपयांचे जुगारे साहित्य बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी त्याच्यावर कारवाई करत साहित्य जप्त केले. या बाबत अधिक तपास पोलिस हे. कॉन्स्टेबल गुजर करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:59 AM 10-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here