रत्नागिरी : चिपळूण ते कराड जाणाऱ्या रस्त्यावरील पोफळी साळवी स्टॉपजवळ अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे.या तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून या प्रकरणी अलोरे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवार ८ ऑक्टोबर रोजी पहाटे ४.३० वा. सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी अनंत साळवी (६१,रा.पोफळी फारुरेवाडी, चिपळूण) यांनी पोलिसांना खबर दिली आहे. या प्रकरणी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल कोळेकर करत आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:58 AM 10-Oct-20