कळंबस्ते येथे प्रौढाची गळफास घेवून आत्महत्या

0

साडवली : संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते ऊमरटवाडी येथील शशिकांत सजणा सनगरे (५०) यांनी राहत्या घरी कोणीही नसल्याचा फायदा घेवून घराच्या माळ्याच्या वाशाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी २ वा. सुमारास उघडकीस आली. दुपारी २ च्या सुमारास मुलगा घरी आला असता त्याला वडील गळफास घेतलेल्या स्थितीत आढळले. दरम्यान, शशिकांत यांनी आत्महत्या का केली, याचे कारण समजू शकलेले नाही. संगमेश्वर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे. या बाबत अधिक तपास संगमेश्वर पोलिस करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:22 PM 10-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here