दापोली : तालुक्यातील खेम धरणासाठी अडीच कोटींचा निधी प्राप्त झाला असून या धरणाचे काम तत्काळ सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी हर्णे खेम धरण भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना दिली. यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत, केबिनेटमध्ये या धरण दुरुस्तीचे लेखी आदेश मुख्यमंत्री यांच्याकडून घेण्यात आले असल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले.हणेर्र् येथे शुक्रवारी (30 रोजी) रामदास कदम यांच्या उपस्थिती या धरणाच्या भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी युवा सेना राज्य कार्यकारिणी सदस्य योगेश कदम, माजी जि. प. सदस्य शंकर कांगणे, मधुकर दळवी, शिवसेना तालुकाप्रमुख प्रदीप सुर्वे, भगवान घाडगे, राजेंद्र फणसे, सुनील दळवी, महिला आघाडीच्या रोहिणी दळवी, पं.स. सदस्य वृषाली सुर्वे, दीप्ती निखार्गे, माजी सरपंच अस्लम अकबानी, सरपंच मुनिरा शिरगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ना.कदम पुढे म्हणाले की, तालुक्यात विविध विकासकामासाठी निधी आणला आहे. त्यामुळे तत्काळ तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून भूमिपूजन करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या धरणासाठी पाटबंधारे विभागाचा निधी खर्ची घालण्यात आला आहे. या धरणाचे काम श्रीनिवास कन्स्ट्रक्शन प्रकाश डोंगरकर करणार असल्याची माहिती त्यांनी ग्रामस्थांना दिली. यावेळी तहसीलदार समीर घारे, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, प. स. पाणीपुरवठा अभियंता संजीवन आनंदे, शाखा अभियंता दीप्ती धारप, जलसंधारण अभियंता आदी उपस्थित होते.
