जिल्ह्यात 24 तासात 31 नवे कोरोना पॉझिटिव्ह; बाधितांचा आकडा आठ हजार पार

0

रत्नागिरी : मागील 24 तासात जिल्ह्यात 31 नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण कोरोना बाधित रुग्णसंख्येचा आकडा आठ हजार पार झाला आहे.

दरम्यान, नव्याने एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 293 झाली आहे.

रविवारी 46 जणांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 7 हजार 117 जण कोरोनामुक्त झाले असून हे प्रमाण 88.91 टक्के आहे.

मागील 24 तासात 127 जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे प्राप्त झाले आहेत. आता पर्यंत 42 हजार 369 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:20 PM 11-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here