कोरोना श्वासाचा फिटनेस जपूया ना…!

0

✍️ डॉ. दिलीप पाखरे

➡ एके ठिकाणी महान शास्त्रज्ञ डॉ. अल्बर्ट आईनस्टाईन यांचे एक वचन आहे. मार्सी शिमाफ या तत्त्ववेड्याने त्याचे सुंदर विवेचन केले आहे. ‘जेव्हा तुम्ही आपले विचार आणि भावना समजून घेण्यात आणि त्यांच्यावर खरोखरच नियंत्रण ठेवण्यात यशस्वी होता, तेव्हा पहा, आपलं जीवन किती सुंदर साकारू शकता., यातच खर स्वातंत्र्य दडलंय. हेच तुमच खर स्वातंत्र्य होय. प्रत्येक व्यक्तीने स्वतःला सर्वाधिक महत्त्वपूर्ण असा एक प्रश्न जरूर विचारावा, ‘ हे विश्व मैत्रीपूर्ण आहे का?’ यातून त्यांनी आवश्यक त्याचीच निवड करण्यास प्रव्वृत्त व्हाल. एक प्रश्न विचारून त्यांनी आपल्याला विचारशील बनण्याची केवढी मोठी संधी दिली.
कोरोनाचा हा अनारोग्याचा काळ, आपल्याकडे आता त्याला सहा महिने होवून गेलेत. प्रचंड ताण, तणाव, मंदी इ. अनेक कारणानी सर्वांची मुख आणि नासिकेसह, सामाजिक अंतरासह सर्वच गोष्टींची निर्बंधता असह्य होत चालली आहे. त्याला शासन आरोग्य व्यवस्था आणि सुरक्षित संरक्षित व्यवस्था जीवावर उदार होवून हे अनारोग्य नियंत्रित आणि समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. आपण स्वतः संयमाचे आणि शिस्तीचे या आरोग्य मिळविण्याच्या सकारात्मक, विधायक, कृतीशील आणि बचावात्मक मिशनचे महत्त्वाचे योध्ये आहोत. म्हणून मास्क विरोधी आंदोलन होवूच नये, असे अपेक्षित आहे. अर्थात जगभर असे ‘नो मास्क’ आंदोलनच्या झलक मध्ये दिसतात. पण नैराश्य आणि निर्बंध यातून असे घडते यातही एक वेगळे मॉय सायकोलॉजीची काही तत्त्वे आहेत. या काळात पोषक उत्तम समाज व्यवस्थेसाठी हे घातक आहे. वस्तुतः गर्दी नसताना आणि सहा फुट अंतर अंतर असेल किवा योग्य अंतर असेल आनारोग्याचा झोन नसेल तर मास्क जरूर वापरू नये पण ‘आरोग्य सुरक्षितता स्वतःची आणि इतर सर्व समाज घटकांची’ असा संसर्ग रोखण्यासाठी फार आवश्यक आहे. जर संवाद साधायचा असेल, बोलायचं असेल तर एकाच्या तोंडावर आणि नाकावर ‘मुखनासिका’ पट्टी (मास्क) असावीच असावी. मात्र, इतर जवळ कोणी असू नये. इथे मी ज्येष्ठ लोकनेते शरदचंद्रजी पवार याचं उदाहरण देईन. ते बघा, अशी सुरक्षित काळजी घेतात आणी तडफेने काम करतात. इथेच मार्सी शिमाफ याचं विवेचन जेव्हा तुम्ही आपले विचार आणि भावना समजून घेण्यात आणि त्यांच्यावर खरोखरच नियंत्रण ठेवण्यात यशस्वी होता, तेव्हा पहा, आपलं जीवन किती सुंदर साकारू शकता, यातच खरं स्वातंत्र्य दडलय.
म्हणून शासनाचे आणि तज्ज्ञांनी दिलेल्या सूचना ‘तीन नियम’ सुरक्षित आरोग्याचे नियमन ‘हात धुवा, मुख नासिका पट्टी वापरा आणि सुरक्षित अंतर ठेवा, हे पाळूयाच पाळूया आणि स्वत:च्या कुटुंबाच्या आणि जगाच्या आरोग्याचे खरे योध्ये ठरुया…!
हे खरे आहे, मास्क वापरताना श्वास घेता येत नाही किंवा काही जणांना खूप त्रास होता. इथे तुमची फुप्फुसाची क्षमता महत्त्वाची आहे. पण कोरोना या विषाणूला तुमची श्वासाशी काहीही देणघेण नाही त्याला फक्त ‘विध्वंस’ हेच माहित आहे. या विषाणूचा प्रत्यक्ष परिणाम फुप्फुसावर होतो. हळूहळू वायू कोशिका (AERIOLES) यात विषाणूचा घातक द्रव यावर परिणाम होतो. आणि फुप्फुसे हळूहळू आणि काही अपेक्षित असांसर्गिक बाधित रोगी किंवा ज्येष्ठ आणि बऱ्याच अपेक्षित जणांच्या फुप्फुसांवर परिणाम करतात. प्राणवायू आणि कार्बन डायऑक्साईड हा फुप्फुसांवर परिणाम करणारा जीवन जपणारा वायू याच ‘तू हि पुढे, मी मागे राहतो ‘ हा निसर्ग नियम सायकल झुगारला जातो. याचा परिणाम कोव्हिद१९ म्हणजेच सोर्स कोव्ही२ हा धाव घेतो. अशी संक्रमित व्यक्ती शिंकते, खोकते, संक्रमित व्यक्तीशी संपर्क साधला जातो. तेव्हा हा श्वसन मार्गाद्वारे पसरतो. पण हा विषाणू नाक, तोंड आणि क्वचित डोळ्यांद्वारे पसरतो.
आता म्हणूनच मास्क वापरूया, हात धुवूया आणि सुरक्षित अंतर राखूया फुप्फुसाची क्षमता वाढवण्यासाठी काही फिजिओथेरपीचे व्यायाम करूया. कारण ‘श्वास’ हाच जीवनाची हमी आहे. एक ‘श्वास’ जीवनाची ‘आस’ वाढवतो. ‘विश्वास’ देतो, आरोग्याच्या हमीची. म्हणून हा श्वास जपण्यासाठी मास्क वापरल्यावर गुदमरल्या सारखं वाटत असेल तर मित्रानो सर्व प्रथम गर्दीत गर्दीत जावू नका. पर्याय नाही, महत्त्वाच्या कामासाठी गेलात, जा. मात्र, लगेच एखाद सुरक्षित ठिकाण बघा. छान पैकी हात सनीटाईझ करा. स्वतःचा सनीटाईझर स्वतःच्या खिशात ठेवा. काढा, हात स्वच्छ करा, मास्क आता काढा, तोंड बंद करा, जोराने नाकाने श्वास घ्या, झेपेल एवढे किंवा पाच आकडे मोजेपर्यंत धरून ठेवा आणि नंतर तोंडाने सोडा. आपल्या नाकाद्वारे हळूहळू श्वास घेत केले तरीही चालेल. आपण इथे आपले स्वतःचे जज असतो. जेवढा वेळ नाकातून श्वास घ्यायला लागला त्याच्या दुप्पट वेळ तोंडातून श्वास बाहेर सोडा. मध्येमध्ये जेथे असाल तिथे हे सर्व आपण करूया. इथे हा बिन खर्चाचा ‘श्वासाचा व्यायामाचा’ उपचार आपला आपणच करावयाचा आहे. इथे आपोआप आपल्यात ‘आरोग्य स्वास्थ्याची नैसर्गिक अवस्था’ आपणच निर्माण करीत आहोत, ती अत्यंत सुरक्षित आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:57 AM 12-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here