खेड : गणपती उत्सवासाठी कोकणात दाखल होणाऱ्या चाकरमानी प्रवाशांची संख्या जास्त असल्याने खासगी तसेच एस.टी. बसेसने महामार्गावरून प्रवासी प्रवास करत असतात. मात्र या कालावधीत अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी तसेच अपघातासारख्या अप्रिय घटना टाळण्यासाठी तसेच प्रवास निर्विघ्न पार पाडण्यासाठी तीन टण्यात अवजड वाहनांना महामार्गावर ‘नो एन्ट्री’ असणार आहे. महामार्गावर अवजड वाहनाची गर्दी कायम असते. यामुळे वाहतुकी कोंडीला सामोरे जावे लागते. यामुळे आवश्यक असलेल्या मालवाहतूक करणारी वाहनांना यातून वगळण्यात आले आहे त्यामध्ये दूध, पेट्रोल, फळे आणि भाज्या यासारख्या आवश्यक वस्तू आणि वैद्यकीय वापरासाठी द्रव ऑक्सिजन वाहून नेणारी वाहने या काळात धावू शकणार आहेत. दहा दिवस चालणाऱ्या उत्सवांमध्ये तीन टप्प्यांत अवजड वाहनांवर बंदी लागू होईल. २ सप्टेंबर पासून पहिल्या टप्याला प्रारंभ होईल टप्पा सकाळी ८ वाजता सुरू होईल. ही बंदी ७ सप्टेंबरते ८ सप्टेंबर आणि १२ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर या कालावधीत लागू होईल. इतर दिवसांवर – ३ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर आणि ९ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर या काळात – जड वाहनांना सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत परवानगी दिली जाणार नाही. उत्सवाच्या वेळी आपल्या गावी जाणाऱ्या लोकांची संख्या पाहता त्यांचा प्रवास सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून या मार्गावर जादा एस.टी. बसेस फेऱ्या देखील वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे उत्सवासाठी कोकणात दाखल होणाऱ्या प्रवाशांचा प्रवास निर्विघ्न पार पडण्याचा आशावाद प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.
