कॅरम स्पर्धेत रा. भा. शिर्के हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची बाजी

0

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनतर्फे जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धा नुकत्याच शिर्के हायस्कूल, रत्नागिरी येथे झाल्या. या कॅरम स्पर्धेत रा. भा. शिर्के हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. प्रत्येक वयोगटातून सहा खेळाडूंची निवड विभागासाठी करण्यात आली आहे. १४ वर्षाखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक शिर्के हायस्कूलची श्रावणी कोलगे, द्वितीय क्रमांक शिर्के हायस्कूलची समीरा शिंदे, तृतीय शिर्के हायस्कूलची मधुरा देसाई, चौथा रा. भा. शिर्के हायस्कूलची गौरी कोलगे, पाचवा जीजीपीएस हायस्कूलची शर्वरी मुरकर, सहावा क्रमांक फाटक हायस्कूलची आर्या पवार यांनी पटकावला. १४ वर्षाखालील मुलांच्या गटात प्रथम क्रमांक रोटरी हायस्कूलचा यश खांवकर, द्वितीय शिर्के हायस्कूलचा यश गराटे, तृतीय एम. एस. नाईक हायस्कूलचा आयान देसाई, चौथा क्रमांक लक्ष्मीकेशव फणसोप हायस्कूलचा आर्यन कांबळे, पाचवा शिर्के हायस्कूलचा अथांग मयेकर, सहावा क्रमांक जीजीपीएस हायस्कूलचा सर्वेश महाकाळ यांनी पटकावला. १७ वर्षाखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक शिर्के हायस्कूलची आकांक्षा कदम, द्वितीय शिर्के हायस्कूलची प्रेरणा राठोड, तृतीय फाटक हायस्कूलची हर्षिता मुळ्ये, चौथा जीजीपीएस हायस्कूलची भक्ती केतकर, पाचवा क्रमांक फाटक हायस्कूलची समीक्षा मुकादम, सहावा क्रमांक फाटक हायस्कूलची सानिका लिंगायत यांनी पटकावला. १७वर्षाखालील मुलांच्या गटात प्रथम क्रमांक रा. भा. शिर्के हायस्कूलचा निर्वाण कांबळे, द्वितीय फाटक हायस्कूलचा अभिषेक तांबे, तृतीय क्रमांक रा.भा. शिर्के हायस्कूलचा सुयश शिदे, चौथा क्रमांक फाटक हायस्कूलचा आर्य शिवलकर, पाचवा क्रमांक पटवर्धन हायस्कूलचा हर्ष शेटये, सहावा क्रमांक नवनिर्माण हायस्कूलचा हृतिक बासने यांनी पटकावला. १९ वर्षाखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक अभ्यंकर कुलकर्णी ज्युनिअर कॉलेजची ईशा खैर, द्वितीय अभ्यंकर कुलकर्णी ज्युनियर कॉलेजची दुर्वा देसाई, तृतीय क्रमांक अभ्यंकर कुलकर्णी ज्युनियर कॉलेजची गायत्री कदम, चौथा क्रमांक अभ्यंकर कुलकर्णी ज्युनियर कॉलेजची तन्मया शिवगण, पाचवा क्रमांक अभ्यंकर कुलकर्णी ज्युनियर कॉलेजची अक्षरा हातखंबकर, सहावा क्रमांक अभ्यंकर कुलकर्णी ज्युनियर कॉलेजची ऋषाली पालकर यांनी पटकावला. १९ वर्षाखालील मुलांच्या गटात प्रथम क्रमांक अभ्यंकर कुलकर्णी ज्युनिअर कॉलेजचा यश कदम, द्वितीय अभ्यंकर कुलकर्णी ज्युनियर कॉलेजचा साहिल भिंगार्डे, तृतीय क्रमांक नॅशनल ज्युनियर हायस्कूल दापोलीचा अब्दुल्लाह चिकटे, चौथा क्रमांक अभ्यंकर कुलकर्णी ज्युनियर कॉलेजचा वरूण वरक, पाचवा क्रमांक ए.पी. एस. हायस्कूल देवरूखचा अथर्व भोई.सहावा क्रमांक ए.पी. एस. हायस्कूल देवरूखचा सौरभ घडशी यांनी पटकावला. या स्पर्धेत जिल्ह्यातून सुमारे ५५० खेळाडू सहभागी झाले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here