यशस्विनीचा जागतिक नेमबाजी स्पर्धेत ‘सुवर्णवेध’

0

रियो दि जानेरो : भारतीय महिला नेमबाज यशस्विनी सिंह देसवालने ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. तिने अंतिम फेरीत युक्रेनच्या ऑलंम्पिक चॅम्पियन ओलेना कोस्टेविच हिच्यावर मात केली. ओलेनाने २००४ च्या ऑलंम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. यशस्विनीने  या स्पर्धेतील सुवर्णपदकाच्या कमाईनंतर ऑलिम्पिक कोटा मिळविण्यात यशस्वी ठरली आहे. ऑलंम्पिकचा कोटा मिळविणारी ती ९ वी नेमबाज ठरली आहे. यापूर्वी अंजुम मुद्गिल, अपूर्वी चंदेला, सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा, दिव्यांश सिंह, राही सरनोबत, संजीव राजपूत आणि मनु भाकर यांनी ऑलंम्पिक कोटा मिळविला होता. या वर्ल्ड कपमधील पॉईंट टेबलमध्ये भारत तीन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पदकासह प्रथम क्रमांकावर आहे. यशस्विनी सिंह पूर्वी या विश्वचषक स्पर्धेत अभिषेक वर्मासह इलेव्हनिल वलारीवन यांनी सुवर्णपदक जिंकले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here