ना. उदय सामंत यांच्या ‘जनता दरबार’ला अभूतपूर्व प्रतिसाद

0

◼️ पहिल्याच ‘जनता दरबारात’ अधिकारी धारेवर

रत्नागिरी : जिल्हावासियांचे प्रश्न सुटावेत यासाठी ना. उदय सामंत यांनी जनता दरबार घेण्याची घोषणा केली होती. त्यानुसार उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांचा जनता दरबार अल्पबचत सभागृहात पार पडला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. गर्ग, मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड, उपजिल्हाधिकारी भडकवार, जि.प. अध्यक्ष रोहन बने, नगराध्यक्ष बंड्याशेठ साळवी, आरोग्य सभापती बाबू म्हाप आदींसह विविध खात्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आलेल्या तक्रारीवरून ना. सामंत यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. यावेळी श्री. सामंत यांनी ‘माझी बांधिलकी माझ्या जनतेशी आहे, त्यामुळे जनतेच्या अडीअडचणी, त्यांचे प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागलेच पाहिजेत’, असा सज्जड दम अधिकाऱ्यांना देत खडे बोल सुनावले. या जनता दरबारात अनेकांनी आपले प्रश्न मंत्र्यांसमोर मांडले. या जनता दरबारात आरोग्य, बांधकाम, शिक्षण, पाणी, महावितरण, रस्ते आदी विषयांवर तक्रारी घेऊन ग्रामस्थ जनता दरबारात सहभागी झाले होते. यावेळी काही प्रश्नांची उकल तात्काळ करण्यात आली. आलेल्या प्रश्नाला थेट उत्तर देत काहींचे प्रश्न जागच्या जागी मार्गी लावल्याने अनेकांनी ना. सामंत यांचे आभार व्यक्त केले. पहिल्याच जनता दरबाराला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
6:33 PM 13-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here