खेडमध्ये कोव्हिड केअर सेंटर व कार्डियाक रुग्णवाहिकेचे लोकार्पण

0

खेड : येथील न.प.च्या एकविरानगर येथील दवाखान्यांमध्ये हिराभाई बुटाला विचार मंच यांच्या सौजन्याने कोव्हिड केअर सेंटरचा प्रारंभ व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बंधन बँक यांच्या माध्यमातून कार्डियाक रुग्णवाहिकेचा लोकार्पण कार्यक्रम दि. १२ रोजी खा. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत झाला. न. प. दवाखान्यात माजी आ. संजय कदम, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष बाबाजी जाधव, मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा नगराध्यक्ष वैभव खेडेकर, उद्योजक कौस्तुभ बुटाला, प्रांत अधिकारी अविशकुमार सोनोने, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस व रायगड जिल्ह्याचे प्रभारी अजय बिरवटकर, नगरसेवक विश्वास मुधोळे, भूषण चिखले, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सतिश चिकणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला महिला व बाल कल्याण समिती सभापती नगरसेविका मानसी चव्हाण, नगरसेविका जयमाला पाटणे,नगरसेवक तौसिफ खोत, नगरसेवक गटनेते अजय माने, नगरसेवक ईलियास खतिब आदी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:42 AM 14-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here