कोकण रेल्वेने वाहिली कोरेच्या उभारणीच्या काळात प्राण गमावलेल्या कामगार-अभियंत्यांना आदरांजली

0

रत्नागिरी : कोकण रेल्वेने आज श्रमशक्ती स्मारकावर 23 व्या स्मरण दिनाच्या निमित्ताने कोकण रेल्वेच्या उभारणीच्या काळात प्राण गमावलेल्या कामगार-अभियंत्यांना आदरांजली वाहिली. कोकणच्या दर्याखोऱ्यातून बोगदे पूल उभारत रेल्वे मार्गाची उभारणी हे एक मोठे आव्हान होते. अनेक अडचणीला सामोरे जात कोकण रेल्वेच्या कामगार-अभियंते-अधिकाऱ्यांनी कोकण रेल्वे मार्गाची निर्मिती केली. या उभारणीच्या काळात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. या रेल्वे मार्गाच्या उभारणी मध्ये बलिदान देणाऱ्या मंडळींच्या आठवणी मध्ये 23 वर्षांपूर्वी कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकांच्या परिसरात श्रमशक्ती स्मारक उभारण्यात आले. आज श्रमशक्ती स्मारकवर विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपेंद्र शेंडये यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी हि उपस्थित होते. यावर्षी कोव्हिड च्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे कडून विशेष खबरदारी घेत गर्दी टाळत हा कार्यक्रम करण्यात आला. कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी हि सामाजिक अंतर राखत, एकावेळी पाच जणच श्रमशक्ती स्मारक परिसरात उपस्थित रहात आदरांजली वाहिली. आजच्या स्मरण दिनाच्या निमित्ताने स्मारकाचा परिसर आकर्षकरित्या सजवण्यात आला होता.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:26 AM 14-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here