रत्नागिरी : राज्याचे गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र वायकर हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. ३ सप्टेंबर रोजी सकाळी ३.२५ वाजता खेड रेल्वेस्थानक येथे आगमन सकाळी ३.३० वाजता खेड रेल्वेस्थानक येथून शासकीय मोटारीने ता. खेड उधळे निवासस्थानाकडे प्रयाण. सकाळी ३.५० वाजता ता. खेड उधळे निवासस्थान येथे आगमन व राखीव. सायंकाळी ५ वाजता ता. चिपळूण अनंत गार्डन येथे आगमन व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याच्या परिसराचे सुशोभिकरणाचे भूमिपूजन कार्यक्रमास पालकमंत्री उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ६.३० वाजता ता. चिपळूण अनंत गार्डन येथून शासकीय वाहनाने चिपळूण शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सायंकाळी ६.४५ वाजता चिपळ्ण शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. रात्री ११.१५ वाजता चिपळूण शासकीय विश्रामगृह येथून चिपळूण रेल्वे स्थानकाकडे प्रयाण. रात्री ११.३० वाजता चिपळूण रेल्वेस्थानक येथे आगमन व जनशताब्दी एक्स्प्रेसने ना. वायकर हे मुंबईकडे जाण्यासाठी रवाना होणार आहेत.
