खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल अजित पवार म्हणतात…

0

पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादीकडून यावर अजून काहीही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नसलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच यावर भाष्य केलंय. राजकीय जीवनात अनेक भेटीगाठी होत असतात, त्यामुळे भेट झाली म्हणजे काही तरी काळंबेरं आहे असं समजू नये, असं अजित दादा म्हणाले.अजित पवारांच्या हस्ते पुण्यात विधान भवन येथे रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. राजकारणात अनेकदा भेटीगाठी चालूच असतात. भेट झाली म्हणजे नक्की काही तरी काळंबेरं आहे असा अर्थ होत नाही. भाजप सत्तेत असतानाही आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून भाजपच्या नेत्यांना भेटायचो. तुम्ही मला गेली कित्येक वर्ष ओळखता, असंही अजित पवार म्हणाले.दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबद्दल आपल्याला काहीही माहित नाही. जेवढं माहित होतं तेवढं तुम्हाला सांगितलंय, असंही सांगायला ते विसरले नाही.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:58 AM 16-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here