संसदेत चाकू घेऊन जाणार तरुण पोलिसांच्‍या ताब्‍यात

0

नवी दिल्‍ली : संसद भवनमध्ये एका व्‍यक्‍तीने चाकू घेऊन जाण्‍याचा प्रयत्‍न केला. यामुळे संसदेच्‍या परिसरात असलेल्‍या सुरक्षा अधिकार्‍यांचा गोंधळ उडाला. मात्र,  सुरक्षा रक्षकांनी त्या तरुणाला ताब्‍यात घेतले. हा तरुण विजय चौकमधून आर्यन गेटच्‍या जवळून संसदेत प्रवेश करण्‍याचा प्रयत्‍न करत होता. सुरक्षा रक्षकांना या तरुणाकडे चाकू आढळला. यानंतर काहीवेळ गोंधळ निर्माण झाला. सूचना मिळताच घटनास्‍थळी पोहोचून पोलिसांनी या तरुणाला ताब्‍यात घेतले. तरुणास ताब्‍यात घेतल्‍यानंतर त्‍याची चौकशी सुरु आहे. तरुणाची ओळख पटली आहे. तरुणाचे नाव सागर इंसा आहे. दिल्‍लीतील लक्ष्‍मी नकरचा हा तरुण रहिवाशी आहे.  यासोबतच हा तरुण  डेरा सच्चा सौदा प्रमुख व बलात्‍कारप्रकरणी तुरुंगात असलेल्‍या गुरमीत राम रहीमचा अनुयायी असल्‍याची माहिती समोर आली आहे.

HTML tutorial


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here