राजापूर: नाटे येथे कार जळून खाक

0

राजापूर/जैतापूर : राजापूर तालुक्यातील नाटे येथे सागरी महामार्गावर कार जळून खाक झाल्याची घटना रविवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घडली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गाडीतील सामानासहित स्विफ्ट डिझायर कार पूर्ण जळाली आहे. प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार चालत्या कारने समोरून पेट घेतल्यानंतर गाडीतील सर्व प्रवासी तत्काळ बाहेर पडले. नाटे गावाच्या जवळच ही घटना घडल्याने नाटे येथे कार जळून खाक माहिती मिळताच अनेकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली . मात्र गाडी सीएनजी असल्याची चर्चा सुरू असल्याने सुरुवातीला कोणी पुढे जाण्यास धजावले नाही. शाहीद फणसोपकर यांनी पोलिस ठाण्यास घटनेची फोनवरून माहिती दिली. पोलिस कर्मचारी संतोष करलकर, विक्रांत कदम, संभाजी कदम, सुयोग वाडकर, ममता नामये आदींनी घटनास्थळी धाव घेतली, धाडसी तरुणांनी गाडीतील सामान बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. किमती सामानासह गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. जब्बार काझी, पिंट्या राजापकर, मनोज आडविरकर, संतोष चव्हाण, नुरू हसये, हसन हुस्स्ये आदींसह साखरी नाटे येथील अनेक मुस्लिम युवकांनी गाडीतील आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. गाडीने भर रस्त्यातच पेट घेतल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.



LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here