चिपळूण: गणेशोत्सवात वीजपुरवठा खंडित

0

चिपळूण : शहर परिसरातील बिलांची थकबाकी असलेल्या सुमारे शंभर वीज ग्राहकांचा ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर वीजपुरवठा खंडित करून चिपळूण महावितरण कंपनीने धक्का दिला आहे. याबाबत शहरातील नागरिकांतून नाराजी व संताप व्यक्त होत आहे. महावितरणने थकीत वीज बिल वसुली मोहीम जोरदारपणे राबविण्यास सुरुवात केली आहे. शहरातील सुमारे शंभरहून अधिक ग्राहकांची वीज बिले थकल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे वसुली मोहीम अंतर्गत व महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या आदेशानुसार वीजपुरवठा खंडित करण्यात आला. कारवाई करताना मात्र संबंधितांना कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नसल्याचे सांगितले जात आहे. परिणामी या कारवाईमुळे शहरातील वीज ग्राहकांची कोंडी झाली आहे. दुसरीकडे कारवाईची माहिती मिळताच ग्राहकांनी बिले भरण्यास विविध भरणा केंद्रांवर गर्दी केली होती.



LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here