चिपळुणात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद, पिसाळलेल्या कुत्र्याने केले ११ जणांना जखमी

0

चिपळूण : शहरात पुन्हा एकदा भटक्या श्वानांनी उच्छाद मांडला आहे. शहरातील काविळतळी परिसरात एका पिसाळलेल्या श्वानाने तब्बल ११ लोकांना चावा घेऊन जखमी केले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नगरपालिकेने तात्काळ भटक्या श्वानांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे. शहरात अनेक भागात अक्षरश: झुंडीने श्वान आढळत आहेत. शुक्रवारी सकाळी काविळतळी परिसरात अशाच झुंडीतील श्वानाने थेट रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांवर हल्ला चढवण्यास सुरुवात केली. एका मागोमाग एक असे तब्बल ११ लोकांना चावा घेऊन त्याने जखमी केले. हा श्वान इतका जबरदस्त पिसाळलेला होता की, चार चाकी, दुचाकी आणि रिक्षावरदेखील त्याने हल्ला चढवला. नगर परिषदेने अशा श्वानांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:38 AM 19-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here