चिपळूणात महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचा संप

0

चिपळूण : आपल्या विविध मागण्यांसाठी येथील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारी संप पुकारला. त्यानुसार चिपळुणातील संघटनेतर्फे दिवसभर लाक्षणिक संपात सहभाग घेतला. कामकाज बंद ठेवून या संपात सर्व कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते. दरम्यान, शासनाने या संपाची दखल घेत ४ सप्टेंबरला बैठक बोलावली आहे. नायब तहसीलदारांना राजपत्रित अधिकाऱ्याचा दर्जा देण्यात आला असून, ग्रेड पे मात्र वर्ग-३च्या पदाचा देण्यात आला आहे. तसेच महसूल लिपीकाचे पदनाम बदलून महसूल सहाय्यक करणे, नायब तहसीलदार संवर्गातील सरळ सेवा भरतीप्रमाणे ३३ टक्क्यांवरुन २० टक्के करणे, अव्वल कारकून वेतन श्रेणीतील त्रुटी दूर करणे, आकृतीबंधात सुधारणा करण्याबाबत दांगट समितीने सादर केलेला अहवाल मंजूर करणे आदी विविध मागण्या प्रलंबित असल्याने महसुल विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी या संपात सहभाग नोंदविला. या संपात संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश सावंत, तालुकाध्यक्ष समीर शेट्ये, उपविभाग उपाध्यक्ष सुहास पवार, शिपाई तालुकाध्यक्ष रवींद्र चाळके तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here