मोदी सरकारकडून ‘आयुष्यमान सहकार’ योजनेची घोषणा

0

नवी दिल्ली : केंद्रात सलग दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर मोदी सरकार विविध योजना आणत आहे. ग्रामीण भारतातील आरोग्य सेवांच्या पायाभूत सुविधांमध्ये आणखी सुधार करण्यासाठी केंद्र सरकारने ‘आयुष्यमान सहकार’ योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ ग्रामीण भारतातील आरोग्य सेवा पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सहकारी संस्थांना १० हजार कोटी रुपयांचे कर्ज देईल.आयुष्यमान भारतच्या धर्तीवर ही नवीन योजना सरकारने आणली आहे. या नवीन योजनेचा शुभारंभ काल करण्यात आला असून या आयुष्यमान सहकार योजनेंतर्गत सहकारी संस्थांना ग्रामीण भागातील रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये उघडण्यासाठी आणि इतर आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी कर्ज देण्यात येणार आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी काल आयुष्यमान सहकार या नवीन योजनेची सुरुवात केली. या योजनमध्ये राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांच्या विकासासाठी सहकारी संस्थांना १०,००० कोटी रुपयांची कर्जे देईल. याविषयी माहिती देताना एनसीडीसीचे व्यवस्थापकीय संपादक संदीप नायक म्हणाले कि,देशभरातील ५२ हॉस्पिटल या सहकारी संस्था चालवतात. तसेच यामध्ये ५ हजार बेडची संख्या असून ‘आयुष्यमान सहकार योजनेतून या ग्रामीण भागातील रुग्णालयांची स्थापना, आधुनिकीकरण, विस्तार, दुरुस्ती, नूतनीकरण, आरोग्य सेवा आणि शैक्षणिक पायाभूत सुविधा पुरवल्या जातील. त्याचबरोबर या योजनेमधून सहकारी रुग्णालयांना वैद्यकीय आणि आयुष शिक्षण सुरू करण्यास देखील मदत होणार आहे. दरम्यान, नसीडीसी फंडाद्वारे सहकारी संस्थांच्या आरोग्य सेवेच्या तरतूदीस प्रोत्साहित केले जाईल.या सहकारी सेवा संस्थांना एनसीडीसीकडून कर्ज मिळू शकेल. महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ही योजना महत्वाची असून देशभर आणि विशेषत: ग्रामीण भागात सहकारी संस्थांची महत्त्वाची भूमिका आहे. सहकारी शेतकरी दुग्ध उत्पादनातून विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यापैकी काही सहकारी संस्था रुग्णालये देखील चालवतात. त्यामुळं त्यांना मोठा फायदा होणार असल्याचे देखील रुपाला यांनी यावेळी संगितले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:16 PM 20-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here