आडिवरेत नेत्र तपासणी शिबिराला प्रतिसाद

0

रत्नागिरी : ओम ग्रुप, आडिवरे आणि इन्फिगो आय केयर हॉस्पिटल रत्नागिरीतर्फे आडिवरे आणि कशेळी गावातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याला आडिवरे भागातील लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आडिवरे येथील श्री महाकाली इंग्लिश स्कूलच्या गजानन सभागृहात रविवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी शिबिर झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून शिबिर झाले. यावेळी ओम ग्रपचे अध्यक्ष रवींद्र भोवड तसेच सचिव उमाशंकर दाते यांनी इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्या हर्षदा राजापकर, संकेत शिंदे आणि अनिल यादव या कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर तपासणी शिबिराला सुरुवात झाली. या शिबिराचा आडिवरे आणि कशेळी परिसरातील सुमारे ९४ नागरिकांनी लाभ घेतला. या शिबिराला नाटे सागरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप काळे यांनी भेट दिली आणि शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी ‘कोविड योद्धा’ म्हणन सहायक पोलिस निरीक्षक दिलीप काळे यांचा सत्कार केला. या प्रसंगी ओम ग्रुपचे खजिनदार प्रसन्नचंद्र दाते, सदस्य स्वप्निल भिडे, पोलिस पाटील, अतिष भोवड, वरद गोरे, भाई फणसे, प्रताप मुरकर, श्रीहर्ष आपटे, परशुराम फणसे आदी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:49 PM 21-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here