लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात रस्ते अपघातासह मृतांच्या संख्येत घट

0

रत्नागिरी : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग आणि अंतर्गत मार्गांवर नऊ महिन्यात ६९ अपघातांमध्ये तब्बल ७६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. नऊ महिन्यात ७६ जणांना रस्ते अपघातात बळी गेला असला तरी गतवर्षीपेक्षा अपघातांची आणि बळींची संख्या कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे अपघात आणि मृतांची संख्या घटल्याचा अंदाज आहे.

कोकण रेल्वेचे आगमन झाल्यानंतर मुंबई‚गोवा महामार्गावरील वाहनांची वर्दळ काहीशी रोडावली. मात्र मागील काही वर्षांपासून रस्त्यांवरील वाहतुकीने पुन्हा गती आली आहे. कोकणात येणार्या तसेच गोव्याकडे जाणार्या गाड्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे साहजिकच अपघाताचे प्रमाणही तेवढेच वाढले होते. मात्र कोरोनामुळे मार्च महिन्यापासून देशातलॉकडाऊन सुरु आहे. काहि महिने जिल्हा बंदी असल्याने वाहनांची वाहतूक पुर्णत: ठप्प झाली होती. त्यामुळे एकूण अपघातात मोठी घट झाली आहे. महिन्याला मृतांची संख्या ५० च्या आसपास असते. मात्र लॉकडाऊन काळात ही संख्या १० च्या खाली आली आहे. तर एप्रिल महिन्यात रस्ते अपघातात एकाचाही मृत्यू झालेला नाही.जानेवारी ते सप्टेंबर या कालवधीत एकूण २२२ अपघात झाले. त्यापैकी ६९ अपघातात ७६ जणांचा बळी गेला. जानेवारी माहिन्यात ११, फेब्रुवारी १४, मार्च ७, एप्रिल ०, मे ७, जून १०, जुलै ८, ऑगस्ट १०, सप्टेंबर ९ अशा मृतांचा समावेश आहे. एकूण २२२ अपघातामध्ये ६९ फेटल अपघातात ७६ जणांचा मृत्यू झाला आहे. ७३ अपघातात १५८ जण गंभीर जखमी झाले तर ५१ अपघातात १३६ जण किरकोळ जखमी झाले आहे. तर २९ अपघातात केवळ वाहनांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात लॉकडाऊन काळापासून रस्ते अपघात मोठी घट झाली आहे. गेल्या पंधरा वर्षातील सर्वात कमी अपघाताची नोंद यावर्षी झाली. पुन्हा आता वाहतूकीला परवानगी देण्यात आल्यामुळे ऑक्टोबर महिन्यात काही प्रमाणात अपघातांमध्ये वाढ झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:22 PM 24-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here