सिटी सेंटर मॉल आग : आदित्य ठाकरेंची घटनास्थळी भेट

0

मुंबई : मुंबई सेंट्रल परिसरात सिटी सेटर मॉलला लागलेली आग ४८ तासानंतरही धुमसतच असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीमध्ये मॉलचे दोन मजले पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. दरम्यान, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी भेट देवून परिस्थितीची पाहणी केली. ट्विटरद्वारे ते म्हणाले की, ‘सिटी सेंटर मॉलमध्ये आगीची घटना घडली होती. सदर घटनास्थळी नुकतीच भेट दिली. या घटनेबाबत मी सातत्याने माहिती घेत होतो. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. आपल्या मुंबई फायर ब्रिगेडच्या धाडसी जवानांनी अग्निशामक रोबोट या आधुनिक तंत्रज्ञानासह आग विझविण्यासाठी यशस्वीपणे कार्य केले’. मुंबई सेंट्रल बेस्ट बस आगारासमोरील सिटी सेंटर मॉलमधील दुसऱ्या मजल्यावर गुरुवारी रात्री ८.५३ च्या सुमारास आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवताना एक उपअग्निशमन अधिकारी आणि चार जवान जखमी झाले. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान ३,५०० हून अधिक नागरिकांना बाहेर काढण्यात यश मिळाले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:22 PM 24-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here