कायरन पोलार्डच्या नावावर खास विक्रम

0

शारजाह : आयपीएल (IPL 2020)च्या शुक्रवारी झालेल्या मॅचमध्ये मुंबई ने चेन्नई चा दारुण पराभव केला. या मॅचमध्ये मुंबईने 10 विकेटने चेन्नईला मात दिली. आयपीएल इतिहासातला चेन्नईचा हा सगळ्यात मोठा पराभव होता. मुंबईची टीम या मॅचमध्ये रोहित शर्मा शिवाय मैदानात उतरली होती. रोहितच्या डाव्या मांडीच्या मागच्या स्नायूला दुखापत झाल्यामुळे तो या मॅचमध्ये खेळू शकला नाही. रोहितऐवजी कायरन पोलार्ड मुंबईचं नेतृत्व करत होता. आयपीएलच्या या मोसमात पहिल्यांदाच कर्णधार म्हणून मैदानात उतरलेल्या पोलार्डने खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. 2020 साली टी-20 क्रिकेटमध्ये पोलार्डचा कर्णधार म्हणून लागोपाठ 15वा विजय आहे. पोलार्डने यावर्षात टी-20 क्रिकेटमध्ये 15 विजय मिळवले आहेत. 2020 साली पोलार्डने कर्णधार म्हणून 17 मॅच खेळल्या, यातल्या 15 मॅचमध्ये त्याची टीम विजयी झाली, तर 1 मॅचमध्ये पराभव आणि एका मॅचचा निकाल लागला नाही. पोलार्डने या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर मुंबईच्या बॉलरनी पोलार्डचा हा निर्णय योग्य ठरवला. 3 रनवरच चेन्नईचे 4 बॅट्समन पॅव्हेलियनमध्ये परतले होते. या धक्क्यांनंतर सॅम करनने एकट्याने किल्ला लढवला आणि चेन्नईला 114 रनपर्यंत पोहोचवलं. करनने 47 बॉलमध्ये 52 रनची खेळी केली, यामध्ये 2 सिक्स आणि 4 फोरचा समावेश होता. शेवटच्या बॉलवर करन बोल्ड झाला. मुंबईकडून बोल्टने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर बुमराह आणि राहुल चहरला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर नॅथन कुल्टर नाईलला 1 विकेट घेण्यात यश आलं. चेन्नईच्या या आव्हानाचा पाठलाग मुंबईने 12.2 ओव्हरमध्ये केला. इशान किशनने 37 बॉलमध्ये नाबाद 68 रन केले, यामध्ये 5 सिक्स आणि 6 फोरचा समावेश होता. तर डिकॉकने 37 बॉलमध्ये 5 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 46 रनची खेळी केली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:16 PM 24-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here