कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा दसरा होणार साधेपणाने साजरा

0

रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नवरात्रोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा झाला. आजचा दसराही पारंपरिक पद्धतीने पण मंदिराच्या मोजक्या मानकर्यांच्या उपस्थितीत साधेपणाने साजरा होणार आहे. रत्नागिरीची भगवती, आडिवरे येथील महाकाली, चिपळूणची विंध्यवासिनी, तुरंबव गावची शारदादेवी, दाभोळ येथील चंडिकादेवी या रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख मंदिरांसह सर्वच ग्रामदेवतांच्या मंदिरांमध्ये घटस्थापनाचा कार्यक्रम आणि ढोल-ताशांच्या गजरातल्या सवाद्य मिरवणुकांनी सोने लुटण्याचा कार्यक्रम दरवर्षी दसऱ्याला होतो. दसऱ्या दिवशी सोने लुटून आणण्यासाठी ग्रामदैवतांच्या पालख्या जातात आणि सोने लुटून परत येतात. त्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा काही मंदिरांमध्ये आहे. यावर्षी मात्र त्यापैकी कोणत्याही प्रथा पाळल्या जाणार नाहीत. सोने लुटून आणले जाणार आहे, पण मंदिराच्या पालखी प्रदक्षिणा काढल्या जाणार नाहीत. यावर्षी कोणत्याही मिरवणुकांशिवाय हा कार्यक्रम होणार असून भाविकांनी गर्दी करू नये, असे आवाहन मंदिरांच्या व्यवस्थापनांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
9:30 AM 25-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here