हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई : ‘पुढच्या महिन्यात आपल्या सरकारला एक वर्ष होतेय. समोरचे सरकार पाडण्याची ‘तारीख पे तारीख’ देत आहेत, देऊ द्यात. मी ज्यावेळी मुख्यमंत्रीपदी बसून कारभाराला सुरुवात केली, त्या दिवसापासून अनेक जण स्वप्न बघत आहेत की हे सरकार पडेल, सरकार पाडू. त्यांना आव्हान देतो की, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवावे’, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुणाचेही नाव न घेता विरोधकांवर हल्लाबोल केला. स्वातंत्र्यवीर सावकर स्मारक ट्रस्टच्या सभागृहात आयोजित शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचे महत्वाचे मुद्दे :

  • महाराष्ट्र ही वाघाची औलाद आहे, आडवं आल्यावर काय होते. याचा इतिहास आहे व भविष्यातही समजेल
  • काही जणांना गुरेढो-याची लसं द्यावी लागतात
  • बेडूक आणि दोन पिलं सद्या इकडून तिकडं उड्या मारतात
  • मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख म्हणून संयमानं बोलण्याचा प्रयत्न करतो. – खोटे आरोप, आळ घेतले जातायत. पण आम्ही शांत राहिलो
  • टक्कर देण्याची खूमखूमी असेल त्यांनी प्रयत्न करावा
  • मंदिरे उघडत नाही म्हणून हिंदुत्वाबद्दल विचारतायत. जेव्हा बाबरी पाडली तेव्हा शेपट्या घालून बिळ्या बसली होती
  • देवळात घंटा बडवणारा नव्हे तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदूत्व हवा
  • कोरोना घालवण्यासाठी थाळ्या बडवायला सांगणारे हिंदुत्व का
  • गोव्यात गोहत्या बंदी का नाही ?
  • जेवढं लक्ष पक्षावर देताय, तेवढं लक्ष देशावर द्या
  • आपल्या हक्काचे ३८ हजार कोटी केंद्राकडं बाकी आहे, ते देतच नाहीयत.
  • जीएसटी पद्धत फसली आहे. पीएमनी चूक मान्य करून जीएसटी रद्द करून जुन्या करप्रणालीकडं जायला हवं
  • इंग्रजांसारखी मस्ती भाजपकडे
  • शिवसेनेसोबतही डाव खेळला गेला होता.
  • मोहन भागवतांना राष्ट्रपती करण्याची मागणी आम्ही केली होती
  • संघमुक्त भारत म्हणणारे नितीश कुमार कसं चालतात ?
  • कोरोनाची लस बिहारमध्ये फुकट देणार आणि आम्ही काय बांग्लादेश मध्ये आहोत का
  • दानवे बाप तुमचा असेल, माझा बाप इकडं आहे. भाडोत्री बाप स्विकारणार नाही. आहेराचे पाकिट घेवून पळणारे तुमचे बाप आहेत
  • दहा तोंडी रावण महाराष्ट्रावर आलाय. एक म्हणतोय, महाराष्ट्र हे पाकव्याप्त काश्मीर आहे. घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत यायचं आणि मुंबईवर बोलायचं

शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा साधेपणाने साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहाच्या हॉलमध्ये दसरा मेळावा साजरा झाला. १९६६ साली शिवसेनेचा दसरा मेळावा पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केला. शिवाजी पार्कवर हा दसरा मेळावा गेल्या पाच दशकांपासून साजरा होत आहे. ३० ऑक्टोबर १९६६ साली शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडला. तेव्हापासून या दसरा मेळाव्याची परंपरा आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:07 AM 26-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here