महाड : गेल्या 48 तासांपासून महाड शहरासह तालुक्यातील विविध क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाने सावित्री नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. महाड शहरात आज (दि.४) सकाळी 7 वाजता सावित्री नदीचे पाणी शिरल्याने नागरिकांना महाड परिषद तसेच स्थानिक प्रशासनाने सतर्कतेचे इशारे दिला आहे. रायगडमध्ये रात्रीपासून पावसाने जोर धरल्याने महाड शहरातील दस्तुरी नाका, गांधारी नाका या परिसरातील सखल भागात पाणी शिरल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. आगामी 48 तासात मुसळधार पर्जन्यवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने नागरिकांनी अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. रायगड खोऱ्यात आज 231.10 मिलिमीटर पाऊस पडला. रात्री महाबळेश्वरला पाऊस नव्हता. मात्र तीन तासांपूर्वी महाबळेश्वरलाही पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे सावित्री नदी पात्रात येणारे पाणी वाढण्याची शक्यता आहे.
