नारायण राणेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

0

मुंबई :  शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे राणे कुटुंबीयांवर टीका केली होती. अप्रत्यक्षपणे भाजपा नेते नारायण राणे यांचा बेडूक असा उल्लेख केला. त्यानंतर आता राजकारण चांगलंच तापलं आहे. मेळावा संपताच नितेश राणे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. तर आता नारायण राणे यांनी पत्रकार परिषद आयोजित करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. एकेरी भाषेत उल्लेख करत कोणाला बेडूक म्हणतो? उद्धव ठाकरेच पुळचट असं नारायण राणे म्हणाले. उद्धव ठाकरे स्वत:ला वाघ म्हणवतात मात्र, ते कोणते वाघ आहेत? पिंजऱ्यातले की पिंजऱ्याच्या बाहेरचे? सीबीआयप्रकरणी पुत्राला स्वत:च क्लिनचीट दिली. स्वत:च्या मुलाला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत, मात्र सुशांत सिंह राजपूत प्रकरणी आदित्य ठाकरे एक दिवस जेलमध्ये जाणार, असेही नारायण राणे म्हणाले. हिंदूत्वावर बोलण्याची नैतिकता सेनेला नाही. निर्बुद्ध आणि शिवराळ भाषण काल मुख्यमंत्र्यांनी केलं. ठाकरे मुख्यमंत्री पदाला लायक नाहीत. शेतकरी, कोरोना याचा मुख्यमंत्र्यांनी भाषणात उल्लेख केला नाही. मुख्यमंत्री यांचं भाषण ताळमेळ नसलेलं होतं. मोदींच्या जीवावर निवडून आलात आणि सेक्युलर पक्षांसोबत गेलात, बेईमानी करून मुख्यमंत्री झालात, अशा शब्दात नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:37 PM 26-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here