लायनेस क्लब ऑफ रत्नागिरी व मनशक्ती केंद्र लोणावळा, शाखा रत्नागिरी यांच्यातर्फे कोरोनाबाधित रुग्णांवर अंत्यविधी संस्कार करणाऱ्या ‘कोव्हिड योद्धयांचा’ सत्कार

0

रत्नागिरी : लायनेस क्लब ऑफ रत्नागिरी व मनशक्ती केंद्र लोणावळा, शाखा रत्नागिरी यांच्या तर्फे कोविड-19 रुग्णांच्या अंत्यविधी संस्कार करणाऱ्या 16 कोव्हिड योद्धयांचा सत्कार करण्यात आला. कोरोनाच्या महामारी काळात जिथे घरातले नातेवाईक अंत्यविधी करू शकत नाहीत आणि काही प्रसंगी तयारही होतं नाहीत अशा संवेदनशील कार्याकरिता स्वतःहून निःस्वार्थ पणे तयार होणे आणि स्वतःच्या घरात सणवार असतानाही पर्वा न करता ते सातत्याने पार पाडणे याकरिता त्यांचा सोलापुरी चादर, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सदरची संकल्पना लाय. सायुजा प्रभावळकर यांची होती. याप्रसंगी लायनेस अध्यक्षा ऍड. कार्तिकी शिंदे, सेक्रेटरी लाय. शामल शेठ, खजिनदार लाय. नेहा साळवी, लाय. सायुजा प्रभावळकर, सौ. अंजली प्रभावळकर आणि राजन नाईक उपस्थित होते. सत्काराला ऊत्तर देताना श्री. जितेंद्र विचारे यांनी सर्वांचे आभार मानले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:57 PM 26-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here