आंबोली : आंबोली येथील पदवीधर शिक्षक म्हणून जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा, वेंगुर्ले मठ नं. २ -शाळेत कार्यरत असलेल्या चंद्रकांत तुकाराम सावंत यांची जागतिक आंतरराष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. जागतिक स्तरावरील या पुरस्कारासाठी ७० देशांचा समावेश आहे. चंद्रकांत सावंत यांची भारतातून निवड झाली आहे. पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत असतानाश्री.सावंत यांनीस्वच्छवसुंदर शाळा, क्रीडा स्पर्धा, भरीव शैक्षणिक कार्य,आदर्श पुरस्कारप्राप्त शाळा बनविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. सावंतवाडी तालुक्यातील फणसवडेसारख्या अतिदुर्गम भागात त्यांच्या शालेय व्यवस्थापनाखाली व मार्गदर्शनाखाली स्वच्छ, सुंदर, क्रीडा संपन्न, गुणवत्ताप्राप्त, जि.प.सिंधुदुर्ग आदर्श शाळा पुरस्कार मिळवून दिला आहे. हा पुरस्कार सन्मान सप्टेंबर महिन्यात नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या या यशस्वी कार्याबद्दल शिक्षक, विद्यार्थी, पालक यांनी अभिनंदन केले आहे.
